कळवण : प्रलंबित व विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार व कर्मचारी संघटनानी संप पुकारल्याने कळवण आगारातील कामगार संघटना संपात सहभागी झाल्याने आज दुसºया दिवशीदेखील आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने एसटी कर्मचारी संपाचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनाचा आसरा घेऊन शेकडो प्रवाशांना प्रवास करीत इच्छितस्थळी पोहचावे लागले. या संपामुळे एसटीच्या कळवण आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.संप सुरूच असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहनांचा शोध घ्यावा लागला. आज सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवासी बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे होते. संपाची कुठलीही माहिती नसल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी अचानक पुकारलेल्या अघोषित संपामुळे सलग दोन दिवसांपासून प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था कोलमडली आहे. सलग दोन दिवसांपासून नेहमीप्रमाणे प्रवासी बसस्थानकात दाखल झाले. मात्र बसच नसल्याने प्रवाशांनी बस वाहतूक सुरू होण्याची वाट बघत होते. मात्र संप अजूनही सुरूच असल्याचे समजताच खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला.ग्रामीण भागात पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून, शासनाने तत्काळ यावर तोडगा काढावा व प्रवाशांचे हाल थांबवावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
कळवण आगाराचे १५ लाखांचे नुकसान
कळवण आगारात ९० एसटी बसेस असून, सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी आगारात ४००हून अधिक कर्मचारी असून, एसटी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून, यात कळवण आगारातील सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने एकही बस आगारातून बाहेर पडली नाही. ासस्थानकात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणादेखील एसटी बसस्थानकावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. एसटी संपकाळात खासगी प्रवासी वाहतूक, खासगी बस यांचा प्रवासी सहारा घेत आहेत. कळवण आगाराचे रोजचे उत्पन्न सात ते साडेसात लाख रु पये असून, अंदाजे पंधरा लाख रु पयांचे दोन दिवसात नुकसान झाले आहे.