पंचवटी : शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिरात तंत्रज्ञानाच्या आधारावर लवकरच लेझर शो सुरूकरण्यात येणार असून, या लेझर शो मुळे संपूर्ण काळाराम मंदिर परिसर उजळणार आहे. या लेझर शोची मंगळवारी (दि. १६)चाचणी घेण्यात आली.
राज्य शासनाच्या पर्यटन निधी माध्यमातून या कामासाठी कोट्यवधीरुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.काळाराम मंदिरापाठोपाठ श्री कपालेश्वर मंदिर सुशोभिकरण, कमान लोकार्पण काम करण्यात येणार आहे. काळाराम मंदिराच्या दर्शनी व मागील बाजूस लेझर शो लावल्यानंतर त्यात प्रभू रामाचे चित्र दिसणार आहे. हा लेझर शो भाविकांसाठी आकर्षण ठरणारआहे.पंचवटीत अनेक देवदेवतांची मंदिरे असून, काळाराम मंदिर वगळता अद्यापपर्यंत कोणत्याही मंदिरात लेझर शो नाही त्यामुळे काळाराम मंदिराला विशेष महत्त्व वाढणार आहे. शासनाने पर्यटन विकास अंतर्गत निधी मंजूर केला असून, येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.