खेडलेझुंगे : तुला खांद्यावर घेईल.... तुला पालखीत मिरवील....साई बाबा मी शिर्र्डीला पायी चालत येईल..., साई बाबा कि जय.... असा जय घोष करीत हजारो साईप्रेमी पायी दींडीचे आयोजन करत असतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी श्री साई समाधी शताब्दी सोहळा असल्याने महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतुनही मोठ्या प्रमाणार साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पायी दिंड्या खेडलेझुंगे मार्गे जात आहेत.गुजरात मधुन येणाऱ्या पायी दिंडीसोहळ्यातील आकर्षण म्हणजे ट्रॅक्टरवरील अंदाजे २१ फुटी साईबाबांची बसलेली मुर्ती होय. शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी गुजरात राज्यातील भाविकांची या वर्षी मोठ्या प्रमाणावर संख्या दिसुन येत आहे. १०० ते १५० लोकांचा समुहाने पायी दिंडी करणाºयांची संख्या विलक्षण दिसुन आली.श्री साई समाधी शताब्दी सोहळा वर्ष असल्याने या वर्षी पायी जाणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याचे दिसुन येत आहे. या पायी दिंडी सोहळ्याच्या जथ्थेच्या जथ्थे येथुन आनंदाने जातात. भाविक भक्तांच्या जेवणासाठी येथील संतवनातील भव्यदिव्य असे प्रांगण उपलब्ध करु न देण्यात आलेले आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. येथुन जातांना प्रत्येक भावीक भक्त समाधान व्यक्त करत आहे.गुजरातच्या विविध शहरातील साई भक्त हे खेडलेझुंगे येथील संतवनामध्ये विश्रांतीसाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी करतात. त्यांना मुक्काम आणि विश्रांतीसाठी येथील हॉल उपलब्ध करु न देण्यात आलेला आहे. येथील १११ फुटी मारुतीचे दर्शन हे येथे येणाºया साई भक्तांसाठी पर्वणी ठरत आहे. उन्हाच्या तडाख्यात पायी चालुन चालुन दमलेल्या भक्तांसाठी येथे चांगल्या प्रकारची सुविधा असल्याने नैताळ्यावरु न धारणगांव विर व खडक, सारोळेथडी मार्गे खेडलेझुंगे येथे भाविक येतात. गोदातीरी असलेल्या संत वनामध्ये त्यांच्या उत्तम सुविधा असल्याने येथे रात्रीस मुक्कामी राहणाºया भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.येथे येणाºया भाविकाचे स्वागत असुन गावामध्ये प्राथमिक गरजा पुर्ण होण्यासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहे. किराणा दुकान, हॉस्पीटलसह तज्ञ डॉक्टर, मेडीकल उपलब्ध असुन गावकरी येणाºया प्रत्येक भक्तांचा आदर केला जातो. येणाºया सर्व भक्तांचा पायीदिंडी सोहळा आनंददायी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते.- विजय गिते, माजी उपसरपंच, खेडलेझुंगे.(फोटो ०४ साईबाबा)
श्री साई समाधी शताब्दी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:36 PM
खेडलेझुंगे : तुला खांद्यावर घेईल.... तुला पालखीत मिरवील....साई बाबा मी शिर्र्डीला पायी चालत येईल..., साई बाबा कि जय.... असा जय घोष करीत हजारो साईप्रेमी पायी दींडीचे आयोजन करत असतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी श्री साई समाधी शताब्दी सोहळा असल्याने महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतुनही मोठ्या प्रमाणार साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पायी दिंड्या खेडलेझुंगे मार्गे जात आहेत.
ठळक मुद्देपायी दिंडी : दिंड्या खेडलेझुंगे मार्गे शिर्डीला रवाना