शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:27 PM

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सवास गुरुवारी अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त व्याख्यान सत्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे अंजनेरी : जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सवास गुरुवारी अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त व्याख्यान सत्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अंजनेरी येथील श्री पंचकृष्ण आश्रमात आयोजित जयंती महोत्सवातील प्रबोधन सभा व व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्यप्रवर महंत सुकेणेकरबाबा शास्री होते. याप्रसंगी महंत सुकेणेकरशास्री यांनी महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा आढावा घेतला. चक्रधरस्वामी यांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराष्टÑात परिभ्रमण करीत तत्कालीन समाजामध्ये धर्मप्रबोधनाचे कार्य केले. त्या काळातील कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जुनाट चालिरीती यांच्यावर त्यांनी प्रहार केला. तसेच सत्य, अहिंसा, समता, स्री-पुरुष समानता, व्यसनमुक्ती आदी गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे, असे शास्री यांनी सांगितले.प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी महानुभाव पंथाचे कार्य आणि नाशिक जिल्ह्यातील पंथाची तीर्थस्थाने या विषयावर विचार व्यक्त केले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संत-महंतांचे स्वागत अंजनेरीचे सरपंच राजेंद्र बदादे आणि संजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास अ‍ॅड. पांडुरंग बोधले, गणेश चव्हाण, योगेश म्हस्के, चिंतामण वैरागी, राजधर सुकेणेकर, लक्ष्मण चिचोंडीकर उपस्थित होते.पहाटे ५ वाजता गोविंदराज बाबा अंकुळनेरकर यांच्या हस्ते देवास मंगलस्नान घालण्यात आले. श्री भगवद्गीता व श्री चक्रधर स्तोत्र पारायण, नामस्मरण करण्यात आले. महंत बाळकृष्ण सुकेणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जन्मसोहळ्याप्रसंगी देवास विडा अवसर, उपहार अर्पण करून आरती करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम