शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

श्री निवृत्तीनाथ मंदिर कलशारोहण सोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 12:07 AM

त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरूच असून, या मंदिरावर येत्या २२ मे रोजी सव्वा किलो ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : २२ मे रोजी सोहळा ; प्रशासकीय समितीची जोरदार तयारी

त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरूच असून, या मंदिरावर येत्या २२ मे रोजी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे.समाधी ट्रस्टचा एकहाती विश्वस्तांचा कार्यकाळ संपवून न्यायालयाने विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा आदेश दिला आणि सन २०१५ मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी सन २०१५ मध्ये विश्वस्त मंडळाचे नियुक्ती केली व प्रथम अध्यक्षपदाचा मान वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांना मिळाला. पुंडलिकराव थेटे, संजय नाना धोंडगे, पवन भुतडा, पंडितराव कोल्हे, जयंतराव गोसावी आदी वारकरी संप्रदायातील मंडळींनी संत निवृत्तीनाथ समाधी ट्रस्टचा कार्यभार हाती घेतला. गायकवाड, धोंडगे महाराज, कोल्हे महाराज, पवन भुतडा यांनी मंत्रालयात निधी आणण्यासाठी वारंवार मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, पण हाती काहीच पडले नाही.दरम्यानच्या काळात सन २०१५ ला नियुक्त झालेल्या विश्वस्तांची मुदत सन २०२० लाच संपली असून, त्यानंतर मात्र धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या निकषानुसार अर्ज बोलावले होते. पण दोन वेळा संधी देऊनही धर्मदाय आयुक्त यांचे निकष पूर्ण न होऊ शकल्याने सध्या विश्वस्त नियुक्ती प्रक्रिया दोन वर्षांपासून थांबविण्यात आली आहे.पण निवृत्तीनाथ मंदिराचे प्रशासकीय कामकाज थांबवू नये म्हणून धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाराखाली प्रशासकीय समिती कामकाज पाहत आहेत. त्यांच्याच कार्यकाळात समाधी मंदिराचे अपुरे राहिलेले काम पूर्ण झाले असून, आता कळसही चढणार आहे.आता केवळ सोन्याच्या कळसाचे काम बाकी आहे. सुमारे सव्वा किलो सोन्याचा कळस देखील लोकवर्गणीतून चढविणार असल्याचा प्रशासकीय समितीने निर्णय घेतला आहे. येत्या २२ तारखेला तो संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरावर चढविण्यात येणार आहे.योगदान महात्त्वाचे...सात वर्षांच्या कार्यकाळात विश्वस्त मंडळावर जे जे अध्यक्ष झाले, त्यांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यास विश्वस्त म्हणून रामभाऊ मुळाणे, पुजारी विश्वस्त म्हणून योगेश गोसावी, अविनाश गोसावी, जिजाबाई लांडे, डॉ. धनश्री हरदास, ललिता शिंदे यांचा समावेश आहे.दरम्यान, रविवारी (दि. २२) सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय समितीची जोरदार तयारी सुरू आहे. या प्रशासकीय समितीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष धर्मदाय आयुक्त कार्यालयातील असून, तीन सदस्य ॲड. भाऊसाहेब गंभिरे, मुख्याधिकारी त्र्यंबक नगर परिषद संजय जाधव व पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे हे आहेत.सरकारी निधीची केवळ घोषणाच...मंदिर भूमिपूजन प्रसंगी २२ कोटी रुपये देऊ, अशी घोषणा करणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री यांनी अद्यापपावेतो एक रुपयाही दिला नाही. ही वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराला एक रुपया देखील महाराष्ट्र शासनाने अद्याप दिलेला नाही. (२५ संत निवृत्तीनाथ महाराज)

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक