नाशिकरोड : परिसरातील शनि मंदिरामध्ये श्री शनैश्चर महाराज जयंती विविध धार्मिक उपक्रमाद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली.देवळालीगाव येथील श्री शनि मंदिरात पाटे तैलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर बिटको चौकातून श्री शनि महाराजांच्या प्रतिमेच्या पालखी मिरवणुकीचा शुभारंभ व पूजन आमदार योगेश घोलप, त्रंबकबाबा भगत यांच्या हस्ते करण्यात आले होते. बिटको चौकातून निघालेली पालखी मिरवणूक मुक्तिधाम मार्गे देवळाली गावपर्यंत काढण्यात आली होती. मिरवणुकीत घोड्यावर राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा केलेले मुले, स्केटिंग पथक, बॅँड पथक आदि सहभागी झाले होते. यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सत्यनारायण पूजा करण्यात आली. सुखी जीवनाचे रहस्य व शनिशास्त्र यावर ओम विश्वात्मक गुरूदेव माउली कृपांकित हरी अनंत महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी अॅड. शांताराम कदम, आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक सूर्यकांत लवटे, विजयनाथ भाई, सुधाकर जाधव, बाळनाथ सरोदे, प्रदीप देशमुख, रूंजा पाटोळे, राजु गायकवाड, शिवाजी लवटे, सुभाष घिया, राजु लवटे, बंटी कोरडे, संतोष सहाणे आदि उपस्थित होते. पंचक शनैश्चर मंडळ पंचक येथे शनैश्चर भक्तमंडळ व समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सकाळी तैलाअभिषेक, सत्यनारायण पूजन, शनियाग यज्ञ व दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अॅड. सुनील बोराडे, प्रकाश बोराडे, प्रदीप भोसले, सुरेश शार्दुल, योगेश मुळाणे, संतोष डहाळे, नामदेव पोरजे आदिंनी केले होते. (प्रतिनिधी)
श्री शनैश्चर महाराज जयंती विविध धार्मिक उपक्रम
By admin | Published: May 20, 2015 1:47 AM