लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.कुशावर्त तिर्थाच्या पाठीमागे असलेलेल्या श्रीकृष्णाच्या त्र्यंबकेश्वर मधील एकमेव मंदीरात दरवर्षी जन्मोत्सवाचा जल्लोष असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे जन्मोत्सवाचे किर्तन रद्द करावे लागले. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करु न गर्भगृहाला पानाफुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाविक दर्शनासाठी येत होते. सनईचे मंजुळ सुर कानावर पडत होते. जन्मोत्सवानिमित्त मंदिराचे वंश परंपरागत पुजारी वेदमुर्ती सचिन लोहगावकर यांनी भगवान श्रीकृष्णांची पंचोपचारे पुजा केली. राधाकृष्णाच्या मनमोहक मुर्तींना नवीन वस्त्र परिधान करु न चैत्राली व कुणाल लोहगावकर यांनी लोभस साजशृंगार केल्याने मुर्तींचे सौदर्य अधिक खुलले होते.मध्यरात्री ठिक बारा वाजता जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. गर्भगृहा समोरील पडदा दूर करताच गोपालकृष्णाचा जयघोष करीत भाविकांनी भगवान राधाकृष्णाच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी केली. पानाफुलांनी सजविलेल्या पाळण्यात बाळकृष्णाची मुर्ती ठेवण्यात आली होती. महिलांनी पाळणा हलवीत पाळणा गित म्हटले. विविध पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर भगवान श्रीकृष्णाची आरती करण्यात आली. पंजेरीचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. (फोटो १२ त्र्यंबक)
त्र्यंबकेश्वरला श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीपुर्ण वातावरणात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 4:56 PM
त्र्यंबकेश्वर : भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
ठळक मुद्दे लोभस साजशृंगार केल्याने मुर्तींचे सौदर्य अधिक खुलले होते.