पंचवटी : जीवन जगताना किती महत्त्व द्यायचे हे आपण भगवान श्रीकृष्णाकडून शिकलो आहे. जीवन, व्यवहार समजून देण्यासाठी श्रीकृष्णाने अवतार घेऊन कर्मयोगाचा सिद्धांत जगाला पटवून दिला, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश मोहन पुराणिक यांनी केले.दिंडोरी रोडवरील शिवराम मंदिरात समाजभूषण कै. शं. पू. जोशी व सत्यबोधककार कै. अॅड. दादासाहेब राजशिर्केयांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेवानिवृत्त न्यायाधीश प्रमोद घाटे यांना पूर्णवाद सत्यबोध समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सेवानिवृत्त न्यायाधीश घाटे यांना अॅड. डॉ. विष्णू पारनेरकर आणि महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना पुराणिक यांनी काळाला जे पाहिजे ते देण्याचे काम पूर्णवादाचे तत्त्वज्ञान करीत आहे. असे त्यांनी सांगितले. सत्कारास उत्तर देताना घाटे यांनी पूर्णवादाने संस्कार घडतात, सूत्रसंचालन प्रशांत आडे, तर प्रास्ताविक केदारआप्पा यांनी केले.
कर्मयोगाचा सिद्धांत श्रीकृष्णाने जगाला दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:27 AM