सिडको : उंटवाडी, कालिकानगर येथील मयूरेश्वर गणेश मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा रविवारी (दि. ४) समारोप होणार आहे. शनिवारी श्रीकृष्ण विवाह व सुदाम्याचे पोहे याविषयावर नीलाताई चौधरी यांनी प्रवचन दिले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उंटवाडी परिसरातील कालिकानगर येथील मयूरेश्वर गणेश मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा रविवारी (दि. ४) समारोप होणार आहे. शनिवारी श्रीकृष्णाच्या विवाहाचा सोहळा पार पडला. त्यांनतर प्रवचनकार नीलाताई चौधरी यांनी सुदाम्याचे पोहे याविषयावर प्रवचन दिले. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी दुपारी प्रवचनानंतर श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा समारोप होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक भाऊसाहेब सोनवणे, मेघश्याम मोरे, विकास बागुल, मधुकर वाणी, राजेंद्र पाटील, यशवंत नेरकर, सुरेश बोरसे, निर्मला मंडलिक, प्रकाश कोतकर, राजेंद्र पोतदार, रवींद्र बागुल, विजय पैठणकर, नामदेव ढोन्नर आदींनी केले आहे. दरम्यान, सोमवारी भागवत कथा व मंदिरांच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी सायंकाळी ७ वाजेनंतर याचा लाभ घ्यावा.
श्रीमद् भागवत सप्ताहाचा आज समारोप मयूरेश्वर गणेश मंदिर : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:16 AM
सिडको : उंटवाडी, कालिकानगर येथील मयूरेश्वर गणेश मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा रविवारी (दि. ४) समारोप होणार आहे.
ठळक मुद्देश्रीकृष्ण विवाह व सुदाम्याचे पोहे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित