नाशिक : जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाला पुरेसे मनुष्यबळ व तीस खाटा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. नाईक यांनी सोमवारी (दि.२८) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास धावती भेट दिली. शहरात आयोजित कृषी महोत्सवानिमित्त नाईक नाशिकमध्ये आले होते. दरम्यान, त्यांनीजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. निखिल सैंदाणे, आयुषचे डॉ. नीलेश पाटील यांनी नाईक यांचे स्वागत केले. दरम्यान, त्यांनी येथील अतिदक्षता विभागात हजेरी लावून तेथील रुग्णांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. तसेच बाह्य रुग्ण तपासणी केंद्राला भेट देत आयुष विभागाची पाहणी केली. डॉ. जगदाळे यांनी आयुष विभागासाठीरु ग्णालय आणि मनुष्यबळाची तरतूद करून द्यावी, अशी मागणी नाईक यांच्याकडे केली. त्यांनीही सकारात्मकता दर्शवत पाठपुरावा करून लवकरात लवकर आयुष विभागास आर्थिक तरतूद आणि मनुष्यबळ पुरविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, नवनियुक्त डॉक्टर व परिचारिकांना नाईक यांच्यासोबत ‘सेल्फी’ घेण्याचा मोह आवरता आला नाही.
श्रीपाद नाईक यांची जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:07 AM