निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील निºहाळे ते खंबाळे रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले असून, ते तातडीने काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील प्रवासीवर्गाने केली आहे.निºहाळे ते खंबाळे रस्त्यावर सिन्नर आगारातून दिवसभर बसेसची ये-जा सुरू असते. मात्र गेली पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे बस वाहतूक बंद असल्याने रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांनी रस्त्यावर आक्रमण केले आहे. त्यामुळे वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने चालकांची अडचण होते.तसेच वाहनधारकांना या काटेरी फांद्या डोळ्याला व अंगाला लागून इजा होण्याची भीती आहे. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन रस्त्यावर वाढलेल्या काटेरी फांद्या तोडण्याची मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे.
खंबाळे रस्त्याला झुडपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 11:07 PM
निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील निºहाळे ते खंबाळे रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले असून, ते तातडीने काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील प्रवासीवर्गाने केली आहे.
ठळक मुद्देनिºहाळे : बांधकाम विभागाने लक्ष देऊन छाटण्याची मागणी