नाशिकरोड : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये गाजर गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये शोभेच्या झाडांसाठी लावलेल्या कुंड्यांमधील शोभेची झाडे वाळून गेले आहेत. त्याठिकाणी गाजरगवत व झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याकडे मनपा उद्यान विभाग दुर्लक्ष करत असल्याने उड्डाणपुलाची शोभाच लयास गेली आहे. वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक व उडानपुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे काळवंडून गेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना रात्री निश्चित अंदाज येत नाही तसेच सिन्नरफाटा येथून उड्डाणपूल चढताना दुभाजक म्हणून लावलेले दगड हे दिसतच नसल्याने अनेक वेळा वाहने त्याच्यावरून जात असल्याने अपघात होऊन वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी मातीने पाण्याचा निचरा होणारा खड्डा बुजून गेल्याने त्याठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून चारचाकी वाहने साचलेल्या पाण्यातून गेल्यावर उडणारे पाणी हे खाली रस्त्यावर पडते. अचानक वरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहनधारकांवर अथवा पादचाऱ्यांवर पडल्याने ते घाबरून जातात. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होणारे खड्डे मोकळे करावेत तसेच दुभाजक व दोन्ही बाजूच्या संरक्षक कठडे यांना रंगरंगोटी करून रिफ्लेक्टर लावावे. उद्यान विभागाने दुभाजकावरील कुंड्यांची स्वच्छता करून नवीन माती टाकून शोभेची रंगीबेरंगी फुलांची झाडे लावून उड्डाणपुलाची शोभा वाढवावी अशी मागणी केली जात आहे.फलकांची गरजमनपा बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या दुभाजकाला व दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतींना नव्याने रंगरंगोटी करून रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. सिन्नरफाटा येथून उड्डाणपूल सुरू होताना दुभाजक म्हणून लावलेल्या दगडाच्या ठिकाणी वाहनधारकांच्या सुरक्षितेसाठी फलक लावणे गरजेचे आहे.
उड्डाणपुलाच्या दुभाजकात वाढली झुडुपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:35 PM
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये गाजर गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण : महापालिकेचे दुर्लक्ष, फुलझाडे लावण्याची मागणी