त्र्यंबकेश्वर : तालुक्याला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून आलेले प्रशिक्षणार्थी म्हणून शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांचा कक्ष त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात सुरू असून नागरिकांनी कामकाजासाठी संपर्क करावा. त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यासाठी प्रथमच असा मोठा अधिकारी जिल्हा प्रशासनाकडून मिळाला आहे.दरम्यान, गुप्ता यांचे कारकीर्दीत येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा होत आहे. यात्रा प्रशासनाने रद्द केली असली तरी यात्रेची परंपरा सुरूच राहणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे. नित्य नैमित्तिक पूजा वगैरे बाबत यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी गुप्ता यांच्या उपस्थितीत संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर प्रशासन समितीची यात्रेबाबत बैठक झाली.
त्र्यंबकेश्वरला प्रांताधिकारीपदी शुभम गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 6:53 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्याला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून आलेले प्रशिक्षणार्थी म्हणून शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांचा कक्ष त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात सुरू असून नागरिकांनी कामकाजासाठी संपर्क करावा. त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यासाठी प्रथमच असा मोठा अधिकारी जिल्हा प्रशासनाकडून मिळाला आहे.
ठळक मुद्देगुप्ता यांचे कारकीर्दीत येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा होत आहे.