पिंपळगाव बसवंत : विवाह म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण अन् सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण...अशी विवाहाची व्याख्या केली जात असली तरी पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी झालेल्या केवळ तीन फूट उंचीच्या वधू-वराच्या विवाह सोहळ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. दोघांना आशीर्वाद देण्यासाठी वºहाडी मंडळींनी गर्दी केली होती. पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्स येथे दि.१४ मार्च रोजी केवळ तीन फूट उंची लाभलेले वधू व वराचा हा शुभविवाह अगदी राजेशाही थाटात झाला. संभळ वाद्यांचा आवाज अन् सोबतीला डीजे, जेवणासाठी खास मांडे,पुरणपोळी, सार, भात व हजारो वºहाडींच्या साक्षीने हा विवाह सोहळा झाला. दिंडोरी तालुक्यातील गोपेगाव येथील शेतकरीगणपत पोपटराव कावळे यांची एकुलती एक कन्या मोनाली लहानपणापासून कमी उंची असल्यामुळे तिच्या लग्नाचा मोठा प्रश्न त्यांना पडला होता. सिन्नर तालुक्यातील मैंढी गावचे चांगदेव लक्ष्मण पिंगळे यांची दोन महिन्यांपूर्वीच कावळे यांचीओळख झाली. बोलता बोलता कावळे यांनी माझी मुलगी अगदी तीन फूट उंची असल्याने तिच्या लग्नाचा विचार करीत आहे. यावरून पिंपळे यांनी आमच्या गावातील दगू कचरू गिते यांचा संदीप हा एम. कॉम. झालेला मुलगाही तीनच फूट उंचीचा असल्याचे सांगितले. त्यात मोनाली व संदीप यांची पसंती झाली. वधू-वरासाठी खास डोली ठेवण्यात आली होती. अगदी राजेशाही थाटाने हा सोहळा पाहण्यासाठी वºहाडी मंडळींनी गर्दी केली होती.
तीन फूट उंचीच्या वधू-वराचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 7:48 PM