नाशिक : श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरु द्वारा गुरुनानक दरबार, सिंगाडा तलावच्या वतीने रविवारी (दि. १८) शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.अरदास पूजेनंतर सिंगाडा तलाव येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील गंजमाळ, शालिमार, एम. जी. रोड सिग्नल, रविवार कारंजामार्गे निघालेल्या या मिरवणुकीची सांगता पंचवटी येथील गुरूद्वारा सिंग सभा येथे करण्यात आली. गुरूग्रंथ साहिब पालखी मिरवणूक यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष कुलविंदरिसंग गुजराज, सचिव हरमिंदरिसंग सिब्बल, खजीनदार बलविंदरिसंग चौधरी, मिरवणूक समिती अध्यक्ष गोल्डी आनंद यांसह परमजितिसंग निगलानी, अवतारिसंग बिरदी, गुरुदेवसिंग चंडोक, हरबनसिंग बेला, प्रितपालसिंग बग्गा, महेंद्रसिंग राजपूत, इंदरसिंग घाटावडे, हरवनसिंग घाटावडे, हरविंदरलिंग संदू, रणधीरसिंग रेणू आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.मिरवणुकीत पंचप्यारे यांसह घोड्यावर स्वार निशाणसाहब यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालखी मिरवणुकीत सहभागी महिलांनी गुरूनानक देवजींचे कीर्तन सादर केले. गुरु द्वारा गुरु नानक दरबार, सिंगाडा तलावच्या वतीने बुधवारपासून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरु द्वारा गुरु नानक दरबार, समिती अध्यक्ष कुलवंतसिंग बग्गा यांनी सांगितले.
गुरुनानक जयंतीनिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:05 AM
श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरु द्वारा गुरुनानक दरबार, सिंगाडा तलावच्या वतीने रविवारी (दि. १८) शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
ठळक मुद्देनगरकीर्तन मिरवणूक : गुरुनानक देवजी कीर्तन सादर