येवला : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ह्यब्रेक द चेनह्णअंतर्गत अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्वच आस्थापना, व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला, दरम्यान, या बंदमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.शासनाने भाजीपाला-फळे, किराणा, दूध, औषध दुकाने व वैद्यकीय सेवा, बेकरी, कृषिविषयक सेवा, पेट्रोलपंप, गॅस, सार्वजनिक वाहतूक या अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व प्रकारची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद केल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह गावातील अनेक रस्त्यांवरील वर्दळच थांबली असून, शुकशुकाट दिसून आला.नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी मंगळवारी (दि. ६) सकाळी विंचूर रोड भागात असलेले हॉटेल मीलन, देवीखुंट येथील जयहिंद हॉटेल आणि नागड दरवाजा भागातील फाइन किराणा ही दुकाने वेळेपूर्वीच उघडी असल्याचे आढळून आल्याने ती सील केली. नागड दरवाजा सर्कलजवळ उभ्या असलेल्या विक्रेत्याचे हातगाड्यावरील साहित्य जप्त करण्यात आले, तर विनामास्क फिरणार्या चार जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला.शहरातील मुख्य पैठणी व्यवसायासह कापड, मोबाइल, इलेक्ट्रिक, सलून आदी अनेक छोटे-मोठे व्यवसायही लॉक झाल्याने व्यापारीवर्गात शासनाच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने किमान आठवड्यात चार दिवस तरी सर्वच व्यावसायिकांना व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून केली जात आहे.कोट -कोरोना संसर्गाने मागील वर्षात सर्वच छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. व्यापारीवर्गाचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना आता पुन्हा ब्रेक द चेन अंतर्गत व्यापार लॉक झाला. यामुळे व्यापार आणि व्यापारी उद्ध्वस्त होणार आहे. शासनाने अशा परिस्थितीत खरे तर सर्वांनाच दिलासा द्यायला हवा.- मुश्रीफ शाह, व्यापारी
येवल्यात शुकशुकाट; बंदमुळे व्यापाऱ्यांत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 11:40 PM
येवला : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ह्यब्रेक द चेनह्णअंतर्गत अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्वच आस्थापना, व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला, दरम्यान, या बंदमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ठळक मुद्देसर्व प्रकारची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद