नांदगाव : राज्य व केंद्र शासनाने लॉकडाऊन उघडल्यावर १६ टक्के कर्मचारी शासकीय कार्यालयात येऊन काम करू शकतील, असे सूचित केले असताना नांदगाव पंचायत समिती येथील जि. प. शिक्षण व बांधकाम विभागातील कार्यालयात मात्र सोमवारी (दि. ८) दिवसभर अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नाही. त्यामुळे येथे शुकशुकाट होता.सर्व कर्मचारी नाशिकहून व अन्य ठिकाणाहून अप-डाऊन करतात. तालुका पंचायत समिती कार्यालय तब्बल अडीच महिन्यानंतर उघडले; परंतु पहिल्याच दिवशी कार्यालय खुले होते; पण तेथे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता. शिक्षण आणि बांधकाम ही दोन्ही कार्यालये मात्र खुली असताना तेथे कोणी फिरकले नाही.सेवकाने कार्यालय उघडून ठेवले होते. दोन्ही कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी हे अपडाऊन करत असतात. त्यामुळे शासकीय कामकाजावर त्याचे परिणाम होत असतात.
नांदगाव पंचायत समितीत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:23 PM