वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आल्याने वणी शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने प्रवेशबंदी करु न जागृतता दाखवली. तालुक्यात र्इंदोरे ,निळवंडी, मोहाडी या ठिकाणी कोरोनाचे बाधित रु ग्ण आढळले याची गंभीर दखल घेत वणी शहर तीन दिवस पुर्णत: बंद ठेवण्याबाबत नागरिक व व्यापारी यांनी निर्णय घेतला. त्यासअनुसरु न मंगळवारी याचे पालन करण्यात आले. याबाबत ग्रामपालिकेने सोमवारी रिक्षा फिरवुन सुचित करत माहिती दिली होती. दरम्यान, कळवण चौफुली पिंपळगाव नाका व संखेश्वर मंदीर परीसर या तीन ठिकाणाहून शहरात प्रवेश करता येतो. या तीनही ठिकाणी बाहेरु न आलेल्या व्यक्ती व वाहनांची माहीती व चौकशी गरजेची आहे. त्यात बाहेरील व्यक्ती विनाकारण दुचाकी व चारचाकीने प्रवेश करत टाईमपास करण्यासाठी येतात अशीही चर्चा आहे तर नाशिक येथुन अपडाऊन करणाऱ्यानीही प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे. वारंवार सुचीत करु नही गांभीर्य नसलेल्या घटकांमुळे अतिरीक्त ताण यंत्रणांवर पडत आहे.
वणी परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 6:13 PM