कवडदरा : महाराष्ट्र राज्यात जुलै 2017 पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणकि अर्हता नसलेले स्वत:ला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत.ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनिधकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे,अशी मागणी महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे. कुलकर्णी म्हणाले, ज्यांच्याजवळ अधिकृत पॅरावैद्यक शैक्षणकि पात्रता नाही व पॅरावैद्यक परिषद रजिस्ट्रेशन नसताना व्यवसाय करत आहेत्याच्या बाबतची तक्र ार प्राप्त करण्याचे अधिकार त्या त्या विभागातील स्थानिय स्वराज्य संस्थांकडे असतात.महाराष्ट्र पॅरावैदक परिषदेस कलम 2 (घ) (ज) मध्ये नमूद केल्याप्रमाणे पॅरावैदक अहर्ता तपासुन नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्राप्त आहेत. परिषदेस अशा अनिधकृतपणे व्यवसाय करणार्या व्यक्तींच्या नावासह तक्र ार प्राप्त होणे आवश्यक आहे.अशा अनिधकृत व्यावसायिक व्यक्तिंची स्थानिय स्वराज्य संस्थांकडून चौकशी होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यास संबंधितावर पॅरावैद्यक परिषद कायद्याच्या कलम 30, 31, 32 प्रमाणे कारवाई होईल.इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असे काही अनेक शैक्षणकि अर्हता नसलेले लोक आहेत त्यांच्याकडे पदवी नाही पण ते नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळत आहेत.त्यांचे ठरावीक डॉक्टरांशी असलेले आर्थिक संबंध आण िहवे तसे रिपोर्टस देण्याची मागणी यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
निधकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 4:56 PM
कवडदरा : महाराष्ट्र राज्यात जुलै 2017 पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणकि अर्हता नसलेले स्वत:ला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत. ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनिधकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे,
ठळक मुद्दे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात