घोटी : ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत व्हावा. ग्रामपंचायतीकडून मिळणारे विविध दाखले, उतारे एका क्लिकवर मिळण्यासाठी एका संस्थेची मदत घेऊन पाच वर्षांपासून अमलात आणलेला संग्राम कक्ष गेल्या वर्षभरापासून बंद पडल्याने तालुक्यातील ग्रामसेवकावर कामाचा अतिरिक्त भार पडला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार थंडावला आहे. दरम्यान शासनाने या योजनेला पर्याय म्हणून ‘आपलं सरकार’ नावाचा कक्ष उभारणार असल्याने ‘आपलं सरकार’ची सर्वच ग्रामपंचायतींनाव ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. संग्राम कक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ््यांनी या संस्थेचा करार संपुष्टात येण्यापूर्वी आम्हाला मानधनावर च परंतु कायम स्वरूपी सेवेत घ्या अशी मागणी केली होती. शासनाने ही मागणी मान्य नाकारल्याने हे कक्ष बंद करण्यात आला आहे.यामुळे हजारो कर्मचारी बेकार झाले आहेत.यामुळे गेली पाच वर्षांपासून संकलित केलेला ग्रामपंचायत चा महत्व पूर्ण डाटा लॉक झाला आहे.दरम्यान याला पर्याय म्हणून शासन आपलं सरकार म्हणून पोर्टल तयार करीत असून यात ग्रामपंचायत चा संपूर्ण डाटा पुन्हा पहिल्यापासून संकलित करण्यात येणार असल्याने कारभार आॅनलाईन होण्यास अजून काही वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.(वार्ताहर)
तालुकानिहाय संग्राम कक्ष ग्रामपंचायत पातळीवर ग्रामपंचायतींकडून दिल्या जाणारा मालमत्तेचा उतारा, विविध महत्वपूर्ण ठराव, जन्म मृत्यूच्या नोंदी व दाखले व इतर महत्त्व पूर्ण माहिती संकलित करून ती आॅनलाईन मिळावी यासाठी शासनाने एका संस्थेशी करार करून तालुकानिहाय संग्राम कक्षांची निर्मिती केली होती. ग्रामपंचायत दस्तऐवजाचा साठा करण्यासाठी या कक्षात मानधनावर कर्मचाऱ््यांची नेमणूक केली होती.याबरोबर सर्व ग्रामपंचायतीना या प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस संगणक व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता.तसेच प्रत्येक ठिकाणी एका आॅपरेटर चीही मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती.गेली पाच वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रणालीला मागील एक वर्षांपासून घरघर लागली आहे.