या संदर्भात काही दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनी ग्राहकच येणार नसतील तर दुकाने उघडी ठेवून काय करायचे असा सवाल त्यांनी केला असून, पावकिलो, अर्धा किलो वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी घरपोच माल देणे परवडणारे नसल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत ग्राहक दुकानात येऊन खरेदी करणार नाहीत तोपर्यंत दुकाने उघडणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट===
ग्राहकाची वस्तुंची ऑर्डरच जर पावकिलो, अर्धा किलोची असणार तर दुकानदार ती कशी देणार? मुळात किरकोळ विक्रेत्याकडे एखाद दुसरा कर्मचारी कामावर असतो. त्यातही सर्वच ग्राहकाचे क्रमांक त्यांचा पत्ता याची दुकानदाराला माहिती नसते. सर्वच ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाहीत. आणि विशेष म्हणजे दुकानदाराला घरपोच माल देणे आर्थिक दृष्ट्या परवडनारे नाही.
- शेखर दशपुते, माजी अध्यक्ष किरकोळ किराणा विक्रेता संघटना