नाशिक : जुळे बाळ जन्माला येणे ही कुतूहलाची बाब नाही; मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.९) आश्चर्याचा धक्का देणारी दुर्मीळातील दुर्मीळ अशा एका आदिवासी महिलेची प्रसूती झाली. या महिलेने दोघा सयामी जुळ्यांना जन्म दिला आहे. अत्यंत आव्हानात्मक व गुंतागुंतीची प्रसूती जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने मध्यरात्री सामान्य पद्धतीने करण्यास यश मिळविले. जन्मलेल्या सयामी जुळ्यांचे लिंगाबाबत कुठलेही निदान अद्याप डॉक्टरांना होऊ शकलेले नाही. मातेची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मातेच्या गर्भाशयात एकाच बिजांडापासून वेगळे होऊन किंवा दोन विभिन्न बिजांडांच्या शुक्राणूंच्या मिलनामुळे दोन गर्भास जुळे म्हटले जाते. अशा गर्भातून जन्मलेल्या नवजात शिशू हे दोन्ही मुले, मुली, किंवा एक मुलगा, मुलगी असू शकतात. मात्र जिल्हा रुग्णालयात एक स्त्री बीज आणि एकाच शुक्राणुमुळे गर्भधारणा स्त्रीला झाली. पण गर्भधारणेनंतर फलित गर्भाचे असंतुलित व अपुऱ्या स्वरूपाच्या विभागणीमुळे अशा प्रकारच्या बाळांचा जन्म झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अजित तिदमे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रूग्णालयात जन्मलेल्या बाळांचे शरीर एकसमान दिसत असून पोट,उत्तर महाराष्टसह पहिलीच घटनानाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्टÑात मात्र शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची प्रसूती होणे ही पहिलीच घटना मानली जात आहे. २०१६ साली मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात अशाप्रकारे सयामी जुळे शिशु तेथील जिल्हा रुग्णालयात जन्माला आले होते. याच वर्षी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात एका महिलेने अशाचप्रकारे सयामी जुळ्यांना जन्म दिला होता.दीड वर्षानंतर या जुळ्यांना शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वेगळे केले होते. १२ डिसेंबर २०१७ साली वीस डॉक्टरांच्या चमूने तब्बल १२ तास अथक परिश्रम घेऊन त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. २०१८ साली सोलापूरमध्ये अशाप्रकारे महिलेने जुळ्यांना जन्म दिला होता.
आदिवासी महिलेने दिला सयामी जुळ्यांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:50 AM