नाशिक : यंदा पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान, नाशिकमध्ये यंदा वाहतुकीचे झालेले दुरवस्थेचे भान आणि ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही यंदा गणेशोत्सवाच्या मंडपाचा आकार तब्बल १० बाय १० फुटाने कमी केला आहे. त्यामुळे रस्त्यापर्यंत जाणारा मंडपाचा भाग यंदा अधिकाधिक मोकळा ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले.रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ हे नाशिकमधील सर्वाधिक जुने गणेशोत्सव मंडळ असून, मंडळ स्थापनेपासून गणेशोत्सवाचे यंदाचे १०१ वे वर्ष आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ या मंडळापासूनच झाला असून, मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक भान राखण्याची परंपरा पाळली जाते. यंदादेखील तेच सामाजिक भान कायम राखत मंडळाने समाजाप्रती जबाबदारीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदा मंडळाने धार्मिक देखाव्यासाठी लागणाऱ्या मोठ्या जागेऐवजी कमी जागेत केवळ म्युझिक लायटिंगचा देखावा करण्यात आला आहे.मंडळाकडून पूरग्रस्तांना ५१ हजारांची मदतयंदा सांगली, कोल्हापूरला महापुराचा प्रचंड तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी खारीचा वाटा म्हणून रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाने यंदा ५१ हजारांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केला आहे.पतसंस्थेकडून ३१ हजारांची मदत दरवर्षी मंडळ किमान ३५ फूट बाय ४० फूट अशा आकारात भव्य धार्मिक देखाव्याची उभारणी करतो. मात्र, तशा देखाव्याऐवजी यंदा २५ बाय ३० फूट अशा १० फूट बाय १० फूट कमी जागेत मंडपाचीच उभारणी करण्यात आली आहे. तसेच मंडळाकडून ५१ हजार आणि रविवार कारंजा सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनेदेखील ३१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.- नरेंद्र पवार, अध्यक्ष, सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थाबांधवांच्या वेदनांची जाण अन् समाजभानराज्यातील पूरग्रस्तांचे अश्रू अजून सुखलेले नसताना आलेला गणेशोत्सव संयमित उत्साहाने साजरा करणे हेच सामाजिक भान आहे. तसेच नाशिकमधील रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याच्या बेतात असताना अजून त्यात भर न घालण्याचे सामाजिक कर्तव्य मंडळांनीपार पाडावे, तेच सध्याचे मोठे समाजकार्य आहे, असे मला वाटते. लोकमतने त्यासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्व नाशिककरांच्या वतीने मी आभार मानतो.- श्रीधर देशपांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
मंडपाचा आकार कमी करीत ‘सिद्धिविनायक’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:58 AM