कसबे-सुकेणे : बाणगंगानगर (ओझर) शाळेत शनिवार दप्तरमुक्त शाळांतर्गत सलाम बॉम्बे फाउण्डेशन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर येथे तंबाखूचे दुष्परिणाम हा उपक्र म राबविण्यात आला.शाळेतील शिक्षक नलिनी अहिरे यांनी तंबाखूचे दुष्परिणामावर आधारित चित्र काढून विद्यार्थ्यांकडून चित्र रंगभरण आयोजित केले. बाणगंगानगर गावातील सर्व पालक व महिला यांचा मेळावा घेऊन तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम या विविध चित्रांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले. या चित्रांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम चित्रांसह माहिती देण्यात आली. तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू या व्यसनांमुळेच कॅन्सरसारखे आजार फोफावले आहे. व्यसनमुक्तीसाठी सलाम बॉम्बे फाउण्डेशनने घेतलेला हा उपक्र म अतिशय स्तुत्य आहे. तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती, शाळेच्या परिसरात धूम्रपान करू नये तसेच शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास सक्त मनाई आहे. शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्र ी करणे मनाई आहे, अशा सूचना दिल्या. रामदास पवार, दत्ता बागुल, विलास कदम, बाजीराव वाघ,ओझर गावचे पोलीसपाटील सुनील कदम, रंजना जाधव, सुमन वाघ उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रंगभरणद्वारे दाखविले तंबाखूचे दुष्परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 11:45 PM
बाणगंगानगर (ओझर) शाळेत शनिवार दप्तरमुक्त शाळांतर्गत सलाम बॉम्बे फाउण्डेशन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर येथे तंबाखूचे दुष्परिणाम हा उपक्र म राबविण्यात आला.
ठळक मुद्देबाणगंगानगर : शाळेतील उपक्रम