वटार : कसमादे परिसरातील मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने विळखा घातला असून, महागडी औषध फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तथापि, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे. पावसाळा सुरू होताच सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या उरकल्या; पण नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हताश झाला होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा पावसाने मोर्चा बागलाणमध्ये वळवल्याने बळीराजाचा जीव मुठीत आलाआहे. मात्र अस्मानी संकटाने बळीराजा त्रस्त असताना पुन्हा त्यात लष्करी अळीने अडचणीत आणले आहे.मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. परिसरात बºयाच शेतकºयांच्या मक्यावर अळीने आक्र मण केले. पिकावर पांढरे चट्टे पडू लागले आहेत.लष्करी अळी कोवळी पाने खाऊन पिकांचे नुकसान करीत असल्याने मका वाया जाण्याचा धोका वाढला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन शिबिर राबवत आहेत. मका पिकांचे दर दोन दिवसांनी निरीक्षण करावे. कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या औषधांचा अवलंब केल्यास मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन करून होणारे नुकसान टाळता येते.
माझ्या चार एकर मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषध फवारणी केली; पण अळी काही पिच्छा सोडण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे.- जिभाऊ खैरनार, शेतकरी, वटार.
शेतकºयांना अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्वरित कृषी विभागाने प्रमाणित औषधे वापरली तर दोन ते तीन आठवड्यात लष्करी अळीचे नियंत्रण शेतकरी करू शकतो.- दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव.