तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरेगाव ते डर्क इंडिया कंपनीपर्यंतचा रस्ता, एकलहरे शिवरस्ता, गंगावाडी ते कालवी, हिंगणवेढे - दारणासांगवी शिवरस्ता, चाडेगाव जखोरी व्हाया कोटमगाव मुख्य रस्ता, कोटमगाव ते ओढा जिल्हा प्रमुख मार्ग, लाखलगाव ते दहावा मैल व्हाया पिंप्रीसैय्यद मुख्य मार्ग या सर्वच रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यांची डागडुजी न झाल्याने काही ठिकाणी डांबर उखडून खडी उघडी पडली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे मुश्किल झाले आहे.
एकलहरे - हिंगणवेढे - दारणासांगवी हा शिवरस्ता मळे भागातून जातो. अनेक ठिकाणी या रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तहसीलदारांनी सदर रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोजणी करुन खुणा निश्चित करून दिल्या. मात्र, अजूनही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नाही. या रस्त्यावरून समोरासमोर वाहने आल्यास वाहनांची कोंडी होते.
सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यावरही ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. जुने सामनगाव ते आडगाव हा रस्ता नाशिक-औरंगाबाद, नाशिक - पुणे व मुंबई आग्रा महामार्गांना मिळणारा ग्रामीण भागातील महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने लाखलगाव ते पिंप्री सैय्यदपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याच रस्त्यावर कोटमगाव, हिंगणवेढे, जाखोरी, चांदगिरी शिवारातही मोठमोठे खड्डे पडले आहेत.
कोट==
शिंंदे गावापासून आग्रा महामार्गापर्यंत जाणारा रस्ता हा चांदगिरी, जाखोरी, कोटमगाव, हिंगणवेढा, लाखलगाव, सैय्यदपिंप्रीमार्गे जाणारा बायपास रिंगरोड आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
- बाळासाहेब म्हस्के - सरपंच, कोटमगाव.
(फोटो ०५ रोड)