सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 08:58 PM2020-08-31T20:58:53+5:302020-09-01T01:07:12+5:30
सिन्नर: येथील शासकीय विश्राम गृह येथे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, प्रांतिक सदस्य भरत टाकेकर, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते उपस्थित होते.
सिन्नर: येथील शासकीय विश्राम गृह येथे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, प्रांतिक सदस्य भरत टाकेकर, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते उपस्थित होते.
बैठकीत सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व संघटनेचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. प्रामुख्याने सिन्नर तालुक्यातील महिला काँग्रेसचे संघटन त्याचप्रमाणे विविध प्रकारचे सर्व सेल शहर काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस एन एस यु आय आधीच सर्व प्रकारचे सेल आहे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ तुषार शेवाळे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी त्याचप्रमाणे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या संदर्भातले विविध प्रश्न आणि केलेल्या कामांचे कौतुक केले. सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सुदाम सांगळे यांनी तालुका काँग्रेस कमिटी काँग्रेस पक्ष अतिशय योग्य पद्धतीने तालुक्यात काम करीत असून काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यासाठी लागणारी पक्षाचे पाठबळ यासंदर्भात सर्व प्रकारच्या सुचना याला करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी या वेळेला मार्गदर्शन केले. या मार्गदर्शना मध्ये सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी कशी करण्यात यावी त्याचप्रमाणे संघटन वाढण्यासाठी कशाप्रकारे काम करणार आहे. त्याचप्रमाणे महिला काँग्रेस युवक काँग्रेस त्याचप्रमाणे विविध प्रकारचे काँग्रेस पक्षाचे सेल यांच्या सर्व अध्यक्षांना काँग्रेस पक्ष उभारणी करता एक प्रकारचे खूप चांगलं मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आली. कोरोना सारख्या महामारी संपूर्ण जग त्रस्त असून आपल्या काँग्रेस कमिटीने त्याचप्रमाणे राज्यात असेल ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना धीर देण्याचा प्रयत्न याला नक्की केलेला आहे. काँग्रेस पक्षाचे वाटचालीकरता माननीय सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि जर आपल्याला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करायचे असतील त्याच प्रमाणे देशांमध्ये हे जातीयवादाचं तयार करून संपूर्ण देशाला विभाजनाच्या वाटेवरती असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला खाली आणण्याकरता काँग्रेस च्या तळातील कार्यकर्त्यांपासून मनःपूर्वक काम करावे लागेल यावेळीही निश्चितपणे माननीय कार्याध्यक्ष यांनी सांगितले. नाशिक पदवीधर पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सिन्नर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम अतिशय योग्य पद्धतीने लोकांची सेवा करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन याठिकाणी करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, सिन्नर तालुका समन्वय उदय जाधव, शिवराम शिंदे, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, बाळासाहेब शिंदे, अश्फाक शेख, सचिन केदार, दामू शेळके, सिन्नर तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जाकीर शेख, रज्जाक सय्यद, शब्बीर शेख, आयुब शेख, इकबाल सय्यद, हेमंत क्षीरसागर, मल्हारी धनगर, सिन्नर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मीनाताई देशमुख, सिन्नर शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रत्नमला मोकळ, यांच्यासह सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस पूर्ण सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळण्यात आले.