नाशिक : ओझर विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. मेहेर या कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला असून, नाशिक ते पुणे ही सेवा येत्या १५ तारखेपासून सुरू नाशिक-पुणे १५ पासूून विमानसेवामेहेरचा प्रस्ताव : विविध संघटनांशी चर्चाकरण्याची तयारी या कंपनीने केली आहे. त्यामुळे रखडलेल्या विमानसेवेला यानिमित्ताने प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत.नाशिकमध्ये ओझर-जानोरी शिवारात नागरी हवाईसेवा सुरू व्हावी, यासाठी यापूर्वीच विमानतळ बांधण्यात आले असून, या सुसज्ज वाहनतळाचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले आहे. तरीही सेवा सुरू झालेली नाही. आता मात्र यापूर्वी नाशिकच्या गंगापूर धरणातून सी प्लेन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मेहेर कंपनीनेच पुढाकार घेतला आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ वर्मा आणि संचालक एस. के. मन यांनी नाशिकमध्ये ‘तान’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ही माहिती देण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला. यापूर्वी नाशिक ते मुंबई या विमानसेवेचा सातत्याने विचार केला जात होता. त्यातही नाशिक ते मुंबई ही सेवा व्यवहार्य नसल्याचे मत वेळोवेळी व्यक्त करण्यात आले आहे. नाशिक ते मुंबई रस्त्याचे चौपदरीकरण आणि मुंबईला जाण्यासाठी असलेल्या रेल्वे त्या पार्श्वभूमीवर नाशिक ते मुंबईचा प्रवास कठीण आहे. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सुरुवातीला छोटे म्हणजे ९ आसनी विमान या सेवेसाठी असेल आणि प्रतिसादानंतर अधिक मोठे विमान वापरले जाणार आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीने ही सेवा सुरू केली जाणार असून, पुण्याला ४५ मिनिटांत पोहचता येणार आहे.या बैठकीस तानचे राजेंद्र बकरे, सागर वाक्चौरे, जयेश तळेगावकर आदि उपस्थित होते.सर्व संस्थांशी चर्चा करणारमेहेर संस्थेने नाशिक-पुणे विमानसेवा सुरू करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तानप्रमाणेच विविध उद्योग-व्यावसायिकांच्या संघटनांशी मेहेर कंपनीचे अधिकारी चर्चा करणार आहेत. ही सेवा किफायतशीर ठरेल आणि कुंभमेळ्यासाठी योग्य ठरेल, असे वाटते.- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान
नाशिक ते पुणे ही विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे
By admin | Published: June 03, 2015 12:07 AM