पेठ तालुक्यात जवळपास ११९७ हेक्टरवर केशर व इतर जातीच्या आंब्यांची लागवड करण्यात आली असून वातावरणातील बदलामुळे मोहोर गळून पडण्याची भिती व्यक्त होत आहे. बेमोसमी पावसामुळे २६२ हेक्टर वरील काजूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पावसाळी पिकांनंतर तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर वेलवर्गीय पिकांची लागवड करतात. त्यामध्ये भोपळा, वाल,कारले, गिलके, टमाटे यांचे उत्पादन घेतले जाते मात्र ऐन उत्पादनाच्या वेळी बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.
बेमोसमी पावसाने फळबागांचे नुकसान होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 4:33 PM