पेठ तालुक्यात जवळपास ११९७ हेक्टरवर केशर व इतर जातीच्या आंब्यांची लागवड करण्यात आली असून, वातावरणातील बदलामुळे मोहर गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे २६२ हेक्टरवरील काजूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पावसाळी पिकांनंतर तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर वेलवर्गीय पिकांची लागवड करतात. त्यामध्ये भोपळा, वाल, कारले, गिलके, टमाटे यांचे उत्पादन घेतले जाते, मात्र ऐन उत्पादनाच्या वेळी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.
कोट...
वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभाग व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती फवारणी करावी. तसेच केवडा व करपा रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ
===Photopath===
151220\15nsk_17_15122020_13.jpg
===Caption===
पेठ तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतांना कृषी अधिकारी अरविंद पगारे व शेतकरी.१५ पेठ २