नाशिक : शहराला हादरवून सोडणाऱ्या या महापुराच्या खुणा अजूनही गोदाकाठावर कायम असून, संपूर्ण देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोदाकाठावर अजूनही गाळाचे ढीग, पुरासोबत वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि वेगवेगळ्या उंचवट्यांवर अडकलेला कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.शहरात आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच झालेल्या मुसळधार पावसामुळे दि. ४ आॅगस्टला गोदावरीला महापूर येऊन थेट नारोशंकराची घंटाही पाण्याखाली गेल्याने नाशिककरांनी गोदेचा रौद्रावतार अनुभवायला मिळाला होता. दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याची पातळी कमी झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या पायाखाली येऊन पूर ओसरला असला.मात्र गोदावरीला आलेला पूर ओसरून महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी महापुरासोबत वाहून आलेला गाळ अजूनही गोदाघाटावर पडून आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने गोदाघाटावर पसरलेल्या पुराट्याचा गाळ जमा करून ठिकठिकाणी मोठे ढीग जमा केले आहेत.दंडात्मक कारवाई फलकाकडे दुर्लक्षमहापालिका प्रशासनाने गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे फलक ठिक ठिकाणी लावलेले आहेत. मात्र या फलकाजवळच अडगळीतली बोट पडलेली असून, मोठ्या प्रमाणात साचलेले शेवाळ आणि कचरा यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणात भर पडत असून महापालिके च्या या फलकामुळे दिव्याखालीच अंधार असल्याचा प्रत्यय याठिकाणी येणाºया पर्यटकांना पाहायला मिळत आहे. महापालिका प्रशासन याकडे केव्हा लक्ष पुरविणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.लाकडाचे ओंडके, चिंध्या अजूनही पडूनमहापुरामुळे गोदाकाठावर मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा पसरला होता. यातील बहुतांश गाळ वाहनांच्या येण्या-जाण्याने आणि महापुरानंतर बरसलेल्या श्रावणसरींनी वाहून गेला असला तरी अजूनही गांधी तलाव परिसरात पुरासोबत वाहून आलेले लाकडाचे ओंडके पडून आहेत. त्यासोबतच पुरात वाहून आलेल्या कपड्याच्या चिंध्या प्लॅस्टिक गोदापात्रातील विजेच्या खांबांना लटकलेल्या अवस्थेत असून, याकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने मात्र कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.४ एककीडे शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असताना संपूर्ण शहरातील निर्माल्य आणि घनकचºयाच्या व्यवस्थापनाचे आव्हान असताना दुसरीकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाला गोदाकाठावरील गाळाचे व कचºयाचे ढीग उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. गोदावरी नदीपात्रातील वाहून आलेला गाळ जिसेबीच्या सहाय्याने काठावरच टाकून दिल्याने भाविकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे.‘स्वच्छ नाशिक ’ प्रतिमेलाही धक्काआॅगस्ट महिन्याच्या पहिल्याच रविवारी गोदावरीला महापूर आल्याने नाशिककरांना मोठा फटका बसला होता. या महापुरातून हळूहळू गोदाकाठ सावरला असून, धार्मिक पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गोदाकाठावर पुन्हा पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र त्यांना साचलेला गाळ आणि ढिगाºयांमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने शहराच्या ‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’ प्रतिमेलाही धक्का बसत आहे.४महिनाभराचा कालावधी उलटत आला तरी एकमुखी दत्तमंदिरासमोर, गांधीतलावाच्या बाजूला, यशवंत महाराज पटांगणासह गाडेमहाराज पुलाजवळ महापुरात वाहून आलेल्या गाळाचे ढीग तसेच आहेत. त्यामुळे गोदाघाटावर बाहेरगावहून येणाºया पर्यटकांना तसेच भाविकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याबद्दल सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापुराच्या खुणा अद्याप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 1:03 AM