लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिंडोरी तालुक्यात नुकत्याच साठ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या . काही गावांमध्ये पॅनल निर्माण झाले होते. तर काही गावांमध्ये पॅनलची निर्मिती नव्हती. वैयक्तिक प्रचार करून उमेदवार आपल्या प्रभागातून निवडून आले.यंदाच्या निवडणूकीचे मुख्य वैशिष्ट्ये ठरले ते महिला वर्गाने उभारलेली विजयाची गुढी. या निवडणुकीत साठ ग्रामपंचायतीमधुन जवळ जवळ २७९ महिला उमेदवार निवडून आल्याने एक प्रकारे आश्चर्यकारक धक्कांच दिला आहे.तर २४० पुरुष उमेदवार उमेदवार निवडून आलेले आहेत.विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला उमेदवारांनी मातब्बर महिला उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ब-याच ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच होतील का काय ? त्यामुळे येत्या २८ जानेवारीला कोण सरपंचपदाचे दावेदार होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लखमापुरला गेल्या वीस वर्षांपासुन महिला सरपंच आहे. त्यात सुभद्रा देशमुख, ज्योती देशमुख, वर्षा सोनवणे, मंगला सोनवणे या महिलांनी लखमापुरगावचे सरपंच पद भुषविले आहे. त्यामुळे यंदा लखमापुर येथील महिला सरपंच मालिका खंडित होते की काय?लखमापुर ग्रामपंचायतीवर आतापर्यंत फक्त एकच महिला उपसरपंच म्हणून निवडून आलेल्या आहे. त्यानंतर सर्व पुरुष वर्गाकडेच उपसरपंचपदांचा कार्यभाग पाहायला मिळतो. यंदाच्या निवडणूकीत मातब्बर उमेदवारांचा पराभव झाल्याने आता पुढे काय ? याकडे संपूर्ण लखमापुरवासीयांचे लक्ष लागले आहे.यंदा जरी महिला उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून असल्या तरी पण काही ग्रामपंचायतीवर पुरुष सरपंचपद जास्त मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. यंदाच्या निवडणूकीत तरुण महिला उमेदवारांनी जोरदार मुंसडी मारल्याने मातब्बर जुन्या व अनुभवी महिला उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे यंदा राजकारणांचा अनुभव नसलेल्या नवीन महिला उमेदवार गाव विकासासाठी काय नवीन धोरण अवलंबतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.- यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पाहावा लागला.- गावच्या विकासांच्या ध्येयाने महिला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या.- निवडून आलेल्या सर्व महिला युवा उमेदवार उच्च शिक्षीत.- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा तरुण वर्ग मोठ्या संख्येने उतरला.
दिंडोरी तालुक्यात महिलाराजची चिन्हे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 6:23 PM
लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देसाठ ग्रामपंचायत निवडणूकीत २७९ महिला विजयी