नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी पश्चिम विभागातील ७, १२ व २४ प्रभागांमधील सर्व पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी कोणतीही हरकत घेतली नसल्याने अवघ्या तासाभरात चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे काही अपक्ष उमेदवारांनी एका प्रभागातून समान चिन्ह मिळण्याची मागणी केली. परंतु निवडणूक आयोगाच्या नियमांचा दाखला देत ही मागणी फेटाळून उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार चिन्हांचे वाटप करण्यात आले. या प्रकरणी चिन्ह वाटपाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भोसले यांना पक्षाचे चिन्ह देऊन शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याचे मान्य करीत भोसले यांच्या पक्षाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. पश्चिम विभागातील तिन्ही प्रभागातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाल्यानंतर शिवसेनेच्या पारड्यात आणखी एका अधिकृत उमेदवाराची भर पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे कुणाल भोसले यांचे पक्षाच्या एबी फॉर्ममध्ये पर्यायी नाव असल्याने अपक्ष म्हणून ठेवलेले नाव आज शिवसेनेचे पक्ष चिन्ह देऊन ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्यावर शिक्कामोर्तब केले. (प्रतिनिधी)
पश्चिम विभागात तासाभरात आटोपली चिन्हवाटप प्रक्रिया
By admin | Published: February 09, 2017 12:37 AM