सायखेडा : धरणक्षेत्रात तसेच नद्यांच्या परीसरात झालेल्या पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून गोदावरीला पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोडलेल्या पाण्यामुळे निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात पुरपरिस्थीती निर्माण होत, गोदावरीने पात्र ओलांडले होते. सकाळी सायखेडा येथील पुलाला पाणी लागले होते. गोदावरीचे पाणी सोडल्याने परिसर जलमय झाला आहे. नदीलगतच्या वीटभट्टी, शेती पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे . तर नांदुरमध्यमेश्वर धरणातुन, सायंकाळी चार वाजेनंतर ५८ हजार २३४ क्यूसेस विसर्ग सुरू होता.गोदावरीने नदीपात्र ओलंडल्याने चाटोरी, नागापुर, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, गोंडेगाव, चापडगाव, मांजरगांव आदी नांदुरमध्यमेश्वर धरणातील गावांतील शेती क्षेत्रात पाणी घुसले होते. दिवसभर संततधार सुरु असल्याने नांदुरमध्यमेश्वर धरणातुन पाण्याचा विसर्ग दुपारनंतर वाढविण्यात आला होता. गोदापात्र ओलंडल्याने नदी काठावरील बहुतांश विटभट्या पाण्याखाली गेल्याने विटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. तर शेतात पाणी घुसल्याने, शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. ग्रामपालिका व प्रशासनाच्यावतीने स्थलांतरित होण्याबाबतच्या नोटीसा काठावरील रहिवाशांना बजविण्यात आल्या असुन, संततधार कायम राहिल्यास आणखी पाणी वाढण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सायखेडा, चांदोरीला पुराचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 4:39 PM