नाशिक : अतांत्रिक कर्मचाऱ्याला ब्रेकडाउनसाठी पाठविल्यामुळे संबंधित कर्मचाºयाला अपघात होऊन तो जखमी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित असताना या प्रकरणावर पडदा टाकला जात असल्याचे समोर आले आहे़ या अपघात प्रकरणी विचारणा केली असता अशी कोणतीही चौकशी केली जाणार नसल्याचे एका अधिकाºयाने सांगितले़ यापूर्वीदेखील डेपो क्रमांक १ मधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या मनमानीविषयी मोठा गदारोळ होऊन कुणावरही कारवाई होऊ शकलेली नव्हती; तोच प्रकार या अपघातप्रकरणी होत असल्याची चर्चा महामंडळात सुरू आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक डेपो क्रमांक १ मधील कर्मचारी ब्रेकडाउनसाठी ठक्कर बझार येथे पाठविल्यानंतर संबंधित कर्मचाºयाला मोठा अपघात झाला. सुदैवाने तो यातून बचावला असला तरी संबंधित कर्मचारी मूळ स्वच्छक असतानाही त्याला ब्रेकडाउनसाठी पाठविण्यात आल्याने मुळात या प्रकरणाचा तपास होणे अपेक्षित आहे. महामंडळात अगोदरच कर्मचाºयांची संख्या कमी, भरतीची अजूनही प्रतीक्षा असल्याने कर्मचाºयांवर ताण पडतो. हे खरे असले तरी अनेक ‘क’ संवर्गातील कर्मचारी डेपोत अधिकारी पदावर बसविण्यात आल्याने त्यांच्याकडून घेतल्या जाणाºया निर्णयामुळे अनेकदा महामंडळ चर्चेत आले आहे़ अनेक ज्येष्ठ कर्मचारी तर त्यांना वरिष्ठांकडून मिळणाºया वर्तणुकीविषयीदेखील तीव्र नाराज आहेत. याच मुद्द्यावर काही महिला कर्मचाºयांनी संबंधित कनिष्ठ कारागीर‘क’ यांची तक्रार विभाग नियंत्रकांकडे केलेली आहे. मात्र त्यांनी प्रकरणात अपेक्षित लक्ष दिले नसल्याने आता तक्रार करावी कुणाकडे अशी कर्मचाºयांची आवस्था झाली आहे. संबंधित कर्मचाºयांची अशी अवस्था असताना जखमी कर्मचाºयाला न्याय मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे़डेपोमध्ये कनिष्ठ कर्मचारी प्रभारी अधिकारी होऊन बसल्याने आता या कर्मचाºयांच्या मर्जीवर संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली जात आहे. अधिकाºयांचे आदेश डावलणे, फोन न घेणे, केव्हाही सुटी टाकून निघून जाणे, असे अनेक प्रकार सर्रास सुरू आहेत.सुरक्षा विभाग करतोय काय?डेपोतील प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांची कॅबिन आणि सुरक्षा कर्मचारी असूनही डेपोमधील आॅइल चोरी, बॅटरी चोरीचे प्रकार सातत्याने होतच असून, याप्रकरणाचे अनेक गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. कार्यशाळेमध्येही अशाच चोरीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र कोणत्याही प्रकरणाच्या तळाशी अधिकारी पोहचू शकले नाही. अशा अनेक प्रकरणांत डेपोतील कोणताही प्रकार समोर येत नसल्याने येथील अधिकारी संशयाच्या भोवºयात आहे.अपघातासारख्या गंभीर प्रकरणाची चौकशी बाजूला सारून किरकोळ कारणांवरून इतर कर्मचाºयांना मात्र चार्जशीट देऊन कारवाईची तयारी एसटी प्रशासनाने केली आहे़ त्यामुळे काम करणारे कर्मचारी तणावात आले आहे़ मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी अशा प्रकारचे चार्जशीट लादले जात आहे़ अशी तक्रार कर्मचारी करीत आहेत़
जखमी अतांत्रिक कर्मचारी चौकशी प्रकरणी मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:14 AM