नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट करण्याच्या शासनाच्या आश्वासनाची पूर्ती करावी, या मागणीसाठी शनिवारी आशा कर्मचाऱ्यांनी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आरोग्य विभागातील आशा व गटप्रवर्तक यांनी ४ सप्टेंबरपासून राज्यात काम बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र शासनाने मानधन तिप्पट करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी दुपारी बारा वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर आशा कर्मचाºयांनी एकत्र येत मूक आंदोलन केले. शासनाने आशा कर्मचाºयांना तिप्पट मानधन करण्याचे दिलेले आश्वासन निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात येऊन सोमवारी (दि. १६) संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने ते ज्या ज्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी असतील त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ बसून, काळी पट्टी तोंडाला लावून आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.या आंदोलनात विजय दराडे, अर्चना गडाख, सायली महाले, ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, शीतल रहाडे, माधुरी रिकामे, कविता काळे यांच्यासह आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
आशा कर्मचाऱ्यांचे मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:26 AM