शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

मराठा समाजाचे नाशकात आज मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:11 AM

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रावसाहेब थोरात मैदानावर आज, सोमवारी (दि. २१) मराठा मूक आंदोलन ...

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रावसाहेब थोरात मैदानावर आज, सोमवारी (दि. २१) मराठा मूक आंदोलन होणार असून, सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी येणाऱ्या आंदोलकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले असून, आंदोलनस्थळी ‘नो मास्क, नो एंट्री’ मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आरक्षणावर भूमिका मांडण्यासाठी सोमवारी (दि. २१) सकाळी १० ते १ वाजेदरम्यान आंदोलनस्थळी निमंत्रित करण्यात आले असून, आंदोलक शांततेत लोकप्रतिनिधींची भूमिका ऐकून घेणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनात सहभागी आंदोलक काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून, काळा मास्क, शक्य असेल त्यांनी भगवा ध्वज घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात लावण्यात आलेल्या भगव्या झेंड्यांमुळे गंगापूर रोडला भगवी झालर प्राप्त झाली आहे.

इन्फो

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

आंदोलकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला प्रारंभ होणार आहे.