येवला : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला शहरातून शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजता सर्वपक्षीय मूक पदयात्रा काढण्यात आली. याचवेळी शहरवासियांनी स्वेच्छेने बंद पाळला. दरम्यान टिळक मैदानावर सर्व पक्षीय शोकसभा होऊन वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.येवला-विंचूर चौफुलीवरून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मूक पदयात्रा निघाली.अटलजी यांची प्रतिमा असलेला रथ पदयात्रेत सहभागी करण्यात आला होता. अटल बिहारी वाजपेयी यांचे येवला शहराशी ऋणानुबंध होते. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याची भावना वक्त्यांनी व्यक्त केली. सभेचे नियोजन भाजप शहर अध्यक्ष आनंद शिंदे,दिनेश परदेशी,युवराज पाटोळे, मीननाथ पवार, बडा शिंदे, धीरज परदेशी,अविनाश कुक्कर, वीरेंद्र मोहरे, गणेश खळेकर, आदर्श बाकळे यांनी केले होते. सभेत अॅड माणिकराव शिंदे , सुशीलभाई गुजराथी, अंबादास बनकर,बाबा डमाळे, सुभाष पाटोळे,राहुल लोणारी,आनंद शिंदे, प्रमोद सस्कर,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,श्रीनिवास सोनी,शैलेश भावसार आदींसह अनेक वक्त्यांनी वाजपेयी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजप शहर अध्यक्ष आनंद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
येवल्यात मूक पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:03 AM
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला शहरातून शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजता सर्वपक्षीय मूक पदयात्रा काढण्यात आली. याचवेळी शहरवासियांनी स्वेच्छेने बंद पाळला. दरम्यान टिळक मैदानावर सर्व पक्षीय शोकसभा होऊन वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ठळक मुद्देसर्वपक्षीय शोकसभा : वाजपेयी यांना श्रद्धांजली