ओझर : जम्मू काश्मीर येथील कठूआ उन्नावा येथे चिमुरडीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या विरोधात ओझर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. मेनरोड येथील समाजमित्र नानासाहेब अक्कर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. असिफाला न्याय मिळालाच पाहिजे असा फलक मार्चाच्या अग्रभागी होता. त्यानंतर लहान मुली व महिला तर सर्वात शेवटी नागरिक सहभागी झाले होते. मेनरोड, जुनी पाण्याची टाकी, भगवा चौक, तांबट लेन, चांदणी चौक, राजवाडा, ग्रामपंचायत, शिवाजीरोड मार्गे पुन्हा मेनरोड येथे मोर्चा आल्यानंतर मानसी शिरापुरे हिने आपल्या निषेधाच्या भाषणात आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. यानंतर महिलांनी पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे व प्रकाश बोराडे यांना निवेदन दिले. शेवटी सर्वांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहून मोर्चाचा समारोप झाला. यावेळी गावातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणीक व सहकार क्षेत्रातील मान्यवर,नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओझर येथे ‘कथुआ’च्या निषेधार्थ मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:18 AM
ओझर : जम्मू काश्मीर येथील कठूआ उन्नावा येथे चिमुरडीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या विरोधात ओझर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. मेनरोड येथील समाजमित्र नानासाहेब अक्कर चौकातून मोर्चास सुरुवात झाली.
ठळक मुद्देसमाजमित्र नानासाहेब अक्कर चौकातून मोर्चास सुरुवात सर्वांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहून मोर्चाचा समारोप