नाशिक : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा कार्यविस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अनिल पवार (२५) हा महाविद्यालयातील कंत्राटी सुरक्षारक्षक असून, तो पुरुष स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून महिलांच्या स्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाइलच्या साह्याने अश्लील चित्रीकरण करीत होता. महाविद्यालयात महिला व पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचे भिंत टाकून विभाजन करण्यात आले आहे. या भिंतीवर पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली असून, या पाण्याच्या टाकीजवळ बसून संशयित चित्रीकरण करीत असताना त्याचा मोबाइल व्हायब्रेट झाल्याने महिलेला संशय आला. तिने वर पाहिले असता संशयिताचा हात आणि मोबाइल दिसल्यामुळे शिक्षिकेने आरडाओरडा करीत बाहेर पळ काढला. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारातील विद्यार्थी आणि शिक्षक काही क्षणांत घटनास्थळाजवळ जमले. याचवेळी चित्रीकरण करणारा कंत्राटी सुरक्षारक्षकही आपल्या बचावासाठी पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वच्छतागृहातून शिक्षिकेचा व्हिडिओ करणाऱ्यास बेदम चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 6:24 PM
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा कार्यविस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकानेच केला शिक्षिकेचा विनयभंगस्वच्छतागृहाच अश्लिल चित्रिकरण केल्याचा आरोप संशयित सुरक्षा रक्षकाला विद्यार्थी, शिक्षकांकडून बेदम चोप