संदीप भालेराव ।नाशिक : शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.केवळ शहरातच नव्हे; तर गावागावांत उपवर मुलांची संख्या वाढली आहे. त्यात शेतकरी कुटुंबातील मुलांचे प्रमाण जास्त आहे.विदर्भ आणि भंडाऱ्यात ही संख्या मोठी असल्याचे सांगितले जात असताना नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याची बाब वधू-वर मेळाव्यातील उपस्थितीवरून समोर आली.रविवारी (दि.२३) नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सर्वजातीय मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटित, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात धडधाकट आणि प्रथम विवाहोत्सुक शेतकरी मुलांनीदेखील आपल्या जीवनसाथीचा याठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिडशेपेक्षा अधिक उपवरांनी आपली नावे नोंदविली. परंतु मुलींची संख्या कमी असल्याने अनेकांचे अर्ज ऐनवेळी नाकारण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यातील काहींना संधी मिळाली तेव्हा त्यांनी मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाहाची तयारी दर्शविली. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील आपली अशीच भावना बोलून दाखविली. कुणी भावासाठी, कुणी दिरासाठी तर कुणी आपल्या मुलांसाठीचे प्रस्ताव उपस्थितांसमोर ठेवले.पूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती. परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.विवाहासाठी तडजोडीची तयारीपूर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीच्या पालकांची धावपळ होत होती, परंतु बदलत्या परिस्थितीत शेतकरी मुलाच्या पालकांना मुलींसाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आता तर विवाहासाठी कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता शेतकरी मुलांची झालेली आहे असेच या घटनेवरून दिसून येते.
मूकबधिर, विधवा, घटस्फोटिताही चालेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:36 AM
शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घटस्फोटिता असेल तरीही विवाह करण्यास तयार झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या मूकबधिर, विधवा-विधूर, घटस्फोटितांच्या वधू-वर मेळाव्यात अशा जवळपास दीडशे उपवर मुलांनी हजेरी लावल्याने त्यांच्या लग्नाची व्यथा समोर आली.
ठळक मुद्देउपवरांची व्यथा : कुणी बायको देता का बायको म्हणण्याची वेळ