येवला : येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांच्या रेशीमगाठी जुळून आल्या आहेत. हिंदू-मुस्लीम समाजबांधवांच्या एकतेचे दर्शन या सोहळ्यात घडले.येवला शहरात हिंदुस्तानी मशीदच्या प्रांगणात सावली सोशल अँड वेल्फेअर ट्रस्ट, टिपू सुलतान सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष संजू वर्धे, उपाध्यक्ष जुबेर शेख, हाजी दादा फिटर, आलमगीर शेख, अतिक अन्सारी, इमरान शेख, रजिवान शेख, रईस अन्सारी, रशीद शेख, जैन्नुद्दिन शेख, जकरिया अन्सारी, फारुख शेख, अनिस अन्सारी, गफ्फार नौशाद शेख, सलमान पटेल, अकमल शेख, जावेद सय्यद यांनी या सोहळ्याचे आयोजन केले.या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. केवळ १ रुपया विवाह नोंदणी फी घेऊन विवाह पार पडले. यावेळी प्रत्येक नवदांपत्याला संसारोपयोगी साहित्य, कपडे, सोन्याचे दागिने देण्यात आले.या उपक्रमास अनेक दानशुरांचाही हातभार लागला. या विविह सोहळयाचा विधी काझी राफिउद्दिन यांनी पार पाडला. येवल्याचा खास फेटा बांधून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आलेप पोलीस निरीक्षक संदीप कोळी, गुलाब पिहलवान, डॉ. संकेत शिंदे, दत्ता महाले, चंद्रकांत निर्मल, सलीम शेख, अय्युब शेख आदींची यावेळी उपस्थिती होती.चांगले कर्म हा एकच धर्म एकच आहे. माणसानेच हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, अशी नावे दिली आहेत. सगळ्या धर्मांचा एकच अर्थ आहे की सर्वांंनी चांगले कर्म करावे. येवल्यात हिंदू-मुस्लीम सामुदायिक विवाह सोहळा होतो हेच येथील नागरिकांच्या एकतेचे दर्शन असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
सामुदायिक विवाह सोहळ्यात जुळल्या रेशीमगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:14 PM
सामुदायिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांच्या रेशीमगाठी जुळून आल्या आहेत. हिंदू-मुस्लीम समाजबांधवांच्या एकतेचे दर्शन या सोहळ्यात घडले.
ठळक मुद्देयेवला : ११ नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य मोफत वाटप