शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

येवल्यात साध्या पद्धतीने गुढीपाडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:57 PM

येवला परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये शासन, प्रशासन यंत्रणा दक्षता घेत असताना नागरिकही स्वत:ची काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी नववर्षाचा सण असणारा गुढीपाडवाही यंदा सर्वांनीच साधेपणाने साजरा केला. लॉकडाउन व इतर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा ‘फिल्ड’वर उतरली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे सावट : लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन फिल्डवर

येवला : शहर व तालुका परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये शासन, प्रशासन यंत्रणा दक्षता घेत असताना नागरिकही स्वत:ची काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी नववर्षाचा सण असणारा गुढीपाडवाही यंदा सर्वांनीच साधेपणाने साजरा केला. लॉकडाउन व इतर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा ‘फिल्ड’वर उतरली आहे.शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनला प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवावगळता सर्वच व्यावसायिकांनी आपली छोटी-मोठी सर्वच आस्थापने लॉकडाउन केली आहेत. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच बाजारपेठांमधील रस्ते सुनसान झाले आहेत. शहरवासीयही स्वसुरक्षेसाठी घरातच बसून आहेत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २४) किराणा दुकाने, मॉलवर गर्दी झाली होती मात्र, बुधवारी (दि. २५) शुकशुकाट राहिला. दैनंदिन भाजीपाला बाजारावरही परिणाम दिसून आला. विशेष म्हणजे मुस्लीम भागात सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन केल्याने मुस्लीम भागातील हालचालही थंडावली होती. शहरा प्रमाणेच तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने गवंडगाव टोलनाका येथे नाकाबंदी करण्यात आलेली असून तालुक्यातील ६ पोलीस बीट मध्ये ६ पोलीस पथक तयार करण्यात आली आहेत. या बरोबरच पाटोदा, अंदरसूल, मुखेड, नगरसूल, जळगावनेऊर, राजापूर या गावांमध्ये पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून व परराज्यातून आलेल्यांची तपासणी केली जात असून, यात ज्यांना आवश्यकता आहे, अशांना होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्यात येत आहे. कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल टोलनाका येथे पोलीस नाकाबंदी करण्यात आली असून, बाहेरील वाहनांची व प्रवाशांची तपासणी पोलीस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम