नांदूरवैद्य : इगतपूरी तालुक्यातील घोटी बाजारात एका दुकानासमोर पडलेली ५० हजार रूपयाची रक्कम प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करणाऱ्या आकाश भगिरथ मराडे याचे प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.चो-या, विश्वासघात, पैशासाठी हाणामारी, पैशामुळे नात्यांमध्ये पडणारी दरी, अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. एखादी किरकोळ वस्तू सापडली तरी तिला लपवून ठेवण्याचे प्रकार देखील घडत आहेत. अशाच घोटी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक भागीरथ मराडे यांचे चिरंजीव आकाश मराडे असे या प्रामाणिक विक्र ेत्याचे नाव आहे. आकाशला सापडलेले पन्नास हजार रु पये मूळ मालकाला परत करून समाजात नैतिकता, विश्वास, चांगुलपणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले. मराडे मागील अनेक वर्षांपासून घोटी येथे आपला बिल्डिंग मटेरिअल सल्पायरचा व्यवसाय करतात. नुकतेच आपले दुकान बंद करून घरी परतत असतानाच दुकानाच्या समोर दोन हजार रूपयांच्या नोटांचा बंडल आढळून आला. यानंतर आकाश मराडे काही वेळ घरी न जाता दुकानासमोर पैसे हरवलेल्या व्यक्तीची वाट पाहत बसले. थोड्याच वेळात एक व्यक्ती रस्त्यावर काहीतरी शोधत शोधत जात असतांना आकाशचे त्यांचेकडे लक्ष गेले ती व्यक्ती पूर्ण चिंताग्रस्त दिसत होती. आकाशने सदर व्यक्तीला शहानिशा करून पैसे परत केले.----------------दिवसभर कष्ट कमवून ठेवलेले अज्ञात व्यक्तीचे हरवलेले पैसे सापडल्यानंतर मनात विचार आला की, सदर रक्कम पोलिस ठाण्यात जमा करू. परंतू काही वेळातच वाट पाहात बसलेल्या पैसे हरवलेली व्यक्ती पैसे शोधत शोधत समोर आल्यानंतर शहाानीशा करून रक्कम मूळ मालकाला परत केली.- आकाश मराडे, बिल्डिंग मटेरिअल व्यवसायिक, घोटी
घोटी येथील तरूणाचा प्रामाणकिपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 1:10 PM