शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

एकलहरे ग्रामस्थ  मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:52 PM

येथील एकलहरेगाव, सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी व सामनगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिला, शालेय विद्यार्थी व कामगारांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

एकलहरे : येथील एकलहरेगाव, सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी व सामनगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिला, शालेय विद्यार्थी व कामगारांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.  एकलहरे गेट नंबर दोनपासून चारी नंबर एकच्या बस स्टॉपपर्यंतच्या परिसरातील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी येथे १५ ते २० भटके कुत्रे कायम ठाण मांडून बसलेले असतात. वाहनधारकांच्या मागे हे कुत्रे पाठलाग करत असल्याने दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडते. कन्नडवाडी समोरील रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांचा हे कुत्रे हमखास पाठलाग करतात. या कुत्र्यांचा त्रास टाळण्यासाठी वाहनधारक एकलहरे वसाहतीमधूनच जाणे पसंत करतात. गेल्या महिनाभरात येथील कुत्र्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून, हे कुत्रे आले कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे रहिवासी, महिला, मुले एकटेदुकटे घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. तर रात्री- अपरात्री कामावर येणारे व घरी जाणाºया कामगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकलहरे वीज केंद्र वसाहतीच्या भिंतीलगतच्या झाडाझुडपातून हे मोकाट कुत्रे ठाण मांडून बसत असल्याने येणाºया-जाणाºयांना सहसा दिसून येत नाहीत. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे आत्तापर्यंत लहान-मोठे अपघातही झालेले आहेत. नाशिक महापालिकेने पकडलेले मोकाट कुत्रे एकलहरे जवळील किर्लोस्करच्या टेकडीलगत सोडले जातात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याच मोकाट कुत्र्यांचा त्रास एकलहरे व सामनगावच्या रहिवाशांना सोसावा लागतो. सामनगाव परिसरातही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्रे रात्रभर परिसरातील रस्त्यांवर व शेतातील पिकांमध्ये धुडगूस घालून शेतमालाचे नुकसान करतात, अशी तक्रार शेतकºयांनी केली आहे.एकलहरे वीज केंद्र वसाहतीच्या भिंतीलगतच्या झाडाझुडपातून हे मोकाट कुत्रे ठाण मांडून बसत असल्याने येणाºया-जाणाºयांना सहसा दिसून येत नाहीत. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे आत्तापर्यंत लहान-मोठे अपघातही झालेले आहेत.

टॅग्स :dogकुत्राNashikनाशिक