या परिसरातील शेतकऱ्यांना थ्री फेज गेल्यानंतर अंधारात राहावे लागत असे. यासाठी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आमदार डॉ.राहुल आहेर व खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजपचे चांदवड तालुका प्रसिद्धिप्रमुख किरण बोरसे यांनी मागणी केली होती. शिंगवे येथील झाल्टे वस्ती, खताळ, गुंड, मढे आदी वाडी-वस्त्यांवर केवळ थ्री फेज वीज मिळत होती, मात्र आठवड्यातील चार दिवस रात्री थ्री फेज वीज मिळत नसल्याने येथील शेतकरी अडचणीत होते.
यावेळी महापारेषणचे मुख्याधिकारी नवलाखे, वीज वितरणचे अधिकारी तिवारी, आव्हाड, उमेश पाटील, किरण बोरसे, आत्माराम खताळ, सचिन थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते. (१६ एमएमजी ४)
===Photopath===
170521\17nsk_18_17052021_13.jpg
===Caption===
१६ एमएमजी ४