नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ साधला जात आहे. पहिल्या टप्प्यात काम सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २४) राबविला. त्यामुळे दुसºया दिवशीही या प्रयोगाचा सर्वाधिक त्रास शाळकरी विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागला. सिग्नलवरूनच विद्यार्थ्यांना शालेय वाहनातून उतरण्यास भाग पडले. तसेच पालकांनीही दुचाकी उभ्या करून पायी चालत शाळेचे प्रवेशद्वार गाठले. सीबीएस येथून त्र्यंबक नाका दरम्यान मोठी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळेची विद्यार्थिसंख्या अधिक असून, शाळा सुटणे व भरण्याची वेळ सकाळी साडेअकरा व बारा वाजेची असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू होती. त्याचवेळी एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविण्यास शहर वाहतूक पोलिसांकडून सुरुवात करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ अधिक उडाली. भर रस्त्यात सिग्नलजवळ शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांना थांबून तेथेच विद्यार्थ्यांना उतरवून देण्यात आले. तेथून पुढे बॅरिकेडच्या अडथळ्यांची शर्यत पार करून विद्यार्थ्यांनी शाळा गाठली.वाहनांच्या लांबच लांब रांगामंगळवारी वाहतूक शाखेच्या प्रयोगाचा पहिला दिवस गोंधळातच संपला. दुसºया दिवशीही वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याने चित्र होते.मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत व त्र्यंबक नाका ते सीबीएसपर्यंत दुहेरी वाहतूक दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर बॅरिकेड्स लावून अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. तसेच सीबीएस येथून त्र्यंबक नाक्याकडे जाण्यासाठी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. यामुळे दुपारी साडेबारा वाजेनंतर सीबीएसवर शरणपूररोड, शालिमारच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मुंबई नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाºया वाहनांना दुपारी नव्या अधिसूचनेनुसार प्रवेश दिला जात होता.नाशिककरांनी दुसºया दिवशीही पोलिसांचे नियोजन व नव्या बदलाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांसोबत खटके उडताना दिसून आले.
एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग: शाळकरी मुलांना दुहेरी त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:25 AM