नाशिक : महापालिकेतर्फे त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात येत असून सीबीएस ते अशोकस्तंभ या मार्गावर कामही सुरू झाले आहे़ याबरोबरच त्र्यंबकनाका ते सीबीएस सिग्नलचे कामही सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर बुधवारी (दि़२०) सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत त्र्यंबकनाका ते सीबीएसकडे येणाऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक होणार आहे़महापालिकेतर्फे करण्यात येणाºया स्मार्टरोडपैकी पहिल्या टप्यात मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंतच्या मार्गावरील काम सुरू करण्यात आले आहे़ यामुळे या ठिकाणची वाहतूक सीबीएसकडून मेहेरच्या दिशेने जाणाºया रस्त्यावरून दुतर्फा सुरू आहे़ याप्रमाणेच आता सिबीएस ते त्र्यंबकनाका सिग्नलपर्यंतची वाहतूक एकेरी मार्गावरून करण्यात येणार आहे. त्यानंतर सिबीएसहून त्र्यंबकनाक्याकडे जाणाºया मार्गावरील काम सुरू होणार आहे.शहर वाहतूक शाखेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर दोन तास एकेरी मार्गावरून दुतर्फा वाहतुकीचा प्रयत्न केला जाणार आहे़ या कालावधीत वाहतूक कोंडी न झाल्यास यावेळेत वाढ तर वाहतूक कोंडीत वाढ झाल्यास हा प्रयोग बंद करण्यात येणारआहे़वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे यांनी केले आहे.
त्र्यंबकनाका ते सीबीएस सिग्नलवर एकेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:16 AM