सिन्नर : येथील स्टेट बॅँक इंडियाच्या शाखेतून पैसे घेवुन बाहेर पडत असताना तरूण व्यापाऱ्याची अज्ञात लुटारूंनी ६८ हजार रूपयांना गंडावल्याचा प्रकार बुधवारी (दि.२३) दुपरी एकच्या सुमारास घडला.खोपडी खुर्द येथील तरूण व्यापारी ईश्वर नामदेव दराडे स्टेट बॅँकेतून ६८ हजारांची रक्कम काढून घेवून जात असताना दोघा अज्ञात व्यक्तींनी त्याला हिंदी भाषेत ‘मै मुंबईसे आया हू, सात महिनेसे मेरे मालिक ने पगार नही दिया है, इसलिए मै मालिकसे एक लाख ३० हजार रूपये चोरी करके लाया हू, मुझे मदत करो. मेरे गाव पोस्टसे पैसे भेजना है और मेरे पास के पैसे गाव नही भेज सकता तुम तुम्हारे पैसे मुझे दो और मेरे पास के पैसे तुम रखलो. मै जब पोस्ट से आऊंगा तब तुम्हारे पैसे वापस दुंगा, तब तक मेरे पैसे तुम्हारे पास रखलो. असे खोटे सांगून दराडे यांच्याकडून ६८ हजार रूपये घेतले. १ लाख ३० हजार रूपये रोख असल्याचे भासवत अज्ञात लुटारूंनी रूमालात ५०० रूपयांच्या नोटेच्या आकाराचे कागद असलेला बंडल व त्याच्यावर ५०० रूपये किमतीची नोट असे देवून दराडे यांची फसवणूक केली. बनावट बंडल पाहिल्यावर त्यांना फसवले गेल्याचे लक्षात आले. सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गणेश परदेशी पुढील तपास करीत आहेत.
सिन्नरमध्ये तरूणाला ६८ हजारांला गुंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 6:02 PM