शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

सिन्नर बाजार समितीची निवडणूक 'टाय'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:12 PM

चुरशीची लढत: माणिकराव कोकाटे गटाला ९ जागा तर राजाभाऊ वाजे गटालाही ९ जागा

- शैलेश कर्पेसिन्नर (नाशिक)- सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक अतिशय अटीतटीची चुरशीची झाली. निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलला ९ जागा मिळाल्या तर माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या जनसेवा परिवर्तन पॅनलला ९ जागा मिळाल्या. भाजप व मनसे युतीच्या तिसऱ्या पॅनलला खातेही उघडता आले नाही.

सोसायटी गटापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. सोसायटी गटाच्या सर्वसाधारण सात जागेतून कोकाटे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले तर वाजे गटाचे दोन उमेदवार विजयी झाले. सोसायटी गटाच्या दोन महिला राखीव जागेसाठी कोकाटे गटाने बाजी मारली. सोसायटी गटाच्या इतर मागासवर्गीय राखीव जागेसाठी कोकाटे गटाने बाजी मारली. तर सोसायटी गटाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या राखीव जागेवर वाजे गटाचे नवनाथ घुगे विजयी झाले.

ग्रामपंचायत सर्वसाधारण गटाच्या चारही जागेवर वाजे गटाने जोरदार मुसंडी घेत सर्वच्या सर्व चार जागा ताब्यात घेतल्या.व्यापारी गटाच्या दोन जागेवर वाजे गटाचे सुनील चकोर व रवींद्र शेळके विजयी झाले. तर हमाल व तोलारी मतदार संघातून कोकाटे गटाचे नवनाथ नेहे यांनी वाजे गटाचे किरण गोसावी यांच्यावर विजय मिळवला.

मतमोजणीच्या वेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करून होते. निकाल निहाय घोषणाबाजी सुरू होती.

सोसायटी गट (सर्वसाधारण) - रघुनाथ एकनाथ आव्हाड (५८३)  ज्ञानेश्वर रामचंद्र कुºहाडे (१९), भाऊसाहेब रामराव खाडे (६०३)विजयी,  शशिकांत गणपत गाडे (६०१) विजयी, शरद उमाजी गिते (५८१), विनायक हौशिराम घुमरे (५८९) विजयी, आबासाहेब विठ्ठलराव जाधव (५७६),  सोमनाथ गंगाधर जाधव (५५१), जालिंदर जगन्नाथ थोरात (५९७)विजयी, शरदराव ज्ञानदेव थोरात (६०३)विजयी,  शिवनाथ कचरु दराडे (५७४), योगेश रंगनाथ माळी (५७२), अनिल रंगनाथ शिंदे (०८) रवींद्र सूर्यभान शिंदे (५८९) विजयी, अनिल दशरथ शेळके (५९०) विजयी, ज्ञानेश्वर विठ्ठल हारळे (५६८). 

सोसायटी गटात महिला राखीव-यमुनाबाई महादू आव्हाड (२१), सुनिता छबू कदम (५९२), ताराबाई बहिरु कोकाटे (५९१), सिंधूबाई केशव कोकाटे (६२३) विजयी, सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर(६१६) विजयी.

सोसायटी गट(इतर मागास वर्गीय)

१) शिवाजी विठोबा खैरनार (६०४).२) संजय वामन खैरनार (६२९)विजयी,३) बहिरु नामदेव दळवी(९)

सोसायटी गट(विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्ग)

१) नवनाथ प्रकाश घुगे (६२५) विजयी.२) रामदास मारुती जायभावे (६०५).३) मीराबाई सुदाम सानप (७).

ग्रामपंचायत गट(सर्वसाधारण)

१) दिलीप बंडू केदार (९).२) शरद आनंदराव गुरुळे (१).३) श्रीकृष्ण मारुती घुमरे (५३५) विजयी.४) पंढरीनाथ धर्माजी ढोकणे (४७२)५) भाऊसाहेब नाना नरोडे (४६५)६) रवींद्र रामनाथ पवार (५०३)विजयी.

ग्रामपंचायत गट(अनुसूचित जाती/जमाती)

१) राजेंद्र दादा कटारनवरे (४).२) गणेश भीमा घोलप (५४७) विजयी.३) दीपक तुकाराम जगताप (४६९).

ग्रामपंचायत गट(आर्थिकदृष्टया दुर्बल गट )

१) जगदीश देवराम कुºहे (४५९)२) प्रकाश पोपट तुपे (५५७) विजयी.

व्यापारी गट-

१) जगन्नाथ गंगाधर खैरनार (७०).२) सुनील बाळकृष्ण चकोर (९५)विजयी.३) नंदकुमार दामोधर जाधव (११)४) विजय रामनाथ तेलंग (६६)५) रवींद्र विनायक शेळके (७९)विजयी.

हमाल व तोलारी गट-

१) किरण सुभाष गोसावी (१२२)२) नवनाथ शिवाजी नेहे (२१९) विजयी.